हे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाराष्ट्रातील तीन युवा लेखकांना युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पवन नालट, मकसूद आफाक आणि श्रुती कानिटकर यांना अनुक्रमे मराठी, उर्दु आणि संस्कृत भाषेतील साहित्य कृतींसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पेशाने शिक्षक असलेले पवन नालट हे मूळचे अमरावतीचे असून त्यांना मी संदर्भ पोखरतोय या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. त्या वेदांतामध्ये पी.एचडी करत आहेत. मकसूद आफाक यांना गिरयाह या उर्दु गजल संग्रहासाठी सन्मानित करण्यात आले आहे. या संग्रहातून त्यांनी मानवी मूल्य आणि आधुनिक सामाजिक संबंध यांमधील संघर्ष मांडला आहे.
तर आयआयटी मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक श्रृती कानिटकर यांना श्रीमतीचरित्रम् या संस्कृत काव्य संग्रहासाठी गौरवण्यात आले आहे. या काव्यसंग्रहातून त्यांनी राधेच्या चरित्रावर प्रकाश टाकला आहे.
SL/KA/SL
29 Dec. 2022