मध्य आशियातील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण
जितेश सावंत
गेला संपूर्ण आठवडा बाजारासाठी फार वाईट ठरला. पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी जवळपास चार वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली. मंगळवारचा सत्र वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवस बाजार घसरणीसह बंद झाले.
कमकुवत जागतिक संकेत, रुपयाची सुरू असलेली घसरण, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती या कारणांमुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आणि बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला.
रुपया ९२.४८ च्या आपल्या आतापर्यंतच्या नीचांकी (All-time low) पातळीवर पोहोचला आहे. रुपयाच्या या घसरणीमुळे केवळ आयात महागली नसून, देशांतर्गत महागाईचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डॉलर विक्री करून रुपयाला आधार देण्याचे प्रयत्न करत असली, तरी जागतिक संघर्षाची तीव्रता पाहता रुपयावरचा दबाव कायम आहे. आणि याचा फार मोठा परिणाम बाजारावर होताना दिसेल.
बाजाराच्या घसरणीचे अजून एक महत्वाचे आणि मोठे कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) विक्रमी विक्री .मार्च २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यात FIIs नी तब्बल ५२,७०४ कोटी रुपयांची विक्री केली असून, केवळ शुक्रवारी १०,७१७ कोटींची विक्री केली यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदार आता भारतीय बाजारातील उच्च ‘व्हॅल्युएशन’ ऐवजी दक्षिण कोरिया, तैवान आणि चीनसारख्या ‘स्वस्त’ बाजारपेठांकडे वळत आहेत.
बाजारासाठी पुढील आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे
बाजाराचे लक्ष
यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक
अमेरिकेची केंद्रीय बँक, यूएस फेडरल रिझर्व्हच्या १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या दोन दिवसांच्या महत्त्वाच्या बैठकीवर असणार आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा १८ मार्च रोजी करण्यात येणार आहे.
अमेरिका–इस्रायल–इराण युद्ध –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, अमेरिकेने इराणवरील हल्ल्यानंतरही आवश्यक असल्यास खार्ग आयलंडवर (Kharg Island) आणखी हल्ले करण्याची शक्यता नाकारलेली नाही. खार्ग आयलंड हे इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या भागावर हल्ले झाल्यास जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमती
विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका याकडे असेल.
सध्या बाजार ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे आणि निफ्टी हळूहळू वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल तथापि, प्रत्येक रॅलीवर विक्रीचा दबाव असेल.
The market is currently oversold, and Nifty may gradually move upward. However, there will be selling pressure during each rally
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 23151.1
KeySupportLevels 23092,22979,22929,22865,22798,22744,22681,22650-22642,22560-22450-22400-22300 Breaking these could lead Nifty to further lower levels
Resistance Levels: 23190,,23276.33,23460.47 and23573.63. These resistance levels are crucial for Nifty.
लेखक : शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in the stock market, financial affairs, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
ML/ML/MS