युजर्स आणि क्रिएटर्ससाठी YouTube ने लाँच केली विशेष फिचर्स

 युजर्स आणि क्रिएटर्ससाठी YouTube ने लाँच केली विशेष फिचर्स

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

यूट्युबने (YouTube) युजर्स आणि क्रिएटर्ससाठी दोन खास फीचर्स लाँच केली आहे. एक तर प्रॉडकास्ट आणि दुसरे म्हणजे ब्रॅण्डेड कन्टेन्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉडकास्ट कसे असेल ते जाणून घेऊ. तुमची मते मांडणे, स्टोरी शेअर करणे आदी अनेक गोष्टी प्रॉडकास्टच्या माध्यमातून शेअर करणे हा एक लोकप्रिय मार्ग आहे. पण, आता क्रिएटर्ससाठी त्यांचे प्रॉडकास्ट त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कन्टेन्टसाठी पैसे मिळवले सोपे होईल. यूट्युबकडून यूट्युब स्टुडिओमध्ये (Youtube Studio) नवीन फीचर आणण्यात येणार आहे; ज्यामुळे क्रिएटर्सना त्यांचे पॉडकास्ट यूट्युब आणि यूट्युब म्युझिकवर सहज प्रकाशित करता येणार आहेत. तसेच त्यांना यूट्युब म्युझिक मुख्यपृष्ठावरील Podcast shelves देखील फायदा होऊ शकतो; जे युजर्सना क्रिएटरचे पॉडकास्ट शोधण्यात आणि त्यात व्यग्र ठेवण्यास मदत करील. यूट्युब म्युझिकवरील क्रिएटर्सचे प्रॉडकास्ट आता ऑन डिमांड, ऑफलाइन आणि बॅकग्राऊंडमधील गोष्ट ऐकण्यासाठीही उपलब्ध असतील. याचा अर्थ पॉडकास्टर यूट्युब प्लॅटफॉर्मवरील जाहिराती आणि सदस्यतांमधून अधिक कमाई करू शकतात.

SL/KA/SL

23 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *