नक्षलग्रस्त भागात राष्ट्रध्वज फडकवल्याने तरुणाची हत्या
कांकेर, दि. २२ : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेरच्या बिनागुंडा या गावातस्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय राष्ट्रध्वज फडकावल्याने मनीष नुरुटी (२४) या तरुणाची हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १५ ऑगस्ट रोजी बिनागुंडा गावात मनीष आणि मंदिरातील इतर ग्रामस्थांनी भारत माता की जयच्या घोषणा देत राष्ट्रध्वज फडकवला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ नक्षलवाद्यांपर्यंत पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशी नक्षलवादी गावात आले. त्यांनी गावकऱ्यांसमोर जनअदालत भरवली. त्यामध्ये नक्षलवाद्यांकडून राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवणाऱ्या मनीष आणि दोन इतर दोघांना आरोपी ठरवले. या बैठकीत मनीषवर पोलिसांचा हेर असल्याचाआरोप ठेवून त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. तर इतर दोघांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी मनीष हेर नसल्याचे स्पष्ट केले असून त्याच्या हत्येचा तपास चालू केला आहे.
SL/ML/SL