पुण्यातील तरुण अमेरिकेतून बेपत्ता
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत भारतीयांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातच आज पुणे येथील एक युवक अमेरिकेत बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय फार चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा.गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केलाय.प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे.
गोपाळ कराड असं बेपत्ता तरुणाच्या वडिलांचं नाव आहे.माझा मुलगा मला परत आला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमचं शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, याबाबत कराड यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
SL/ML/SL
7 April 2024