पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर तरुणीला अटक

हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची रिमांड मिळाली.
हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा एजन्सींच्या देखरेखीखाली होती.
ज्योती पाकिस्तानात क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्यावर सुरक्षा यंत्रणांचा तिच्यावरील संशय अधिकच वाढला. तिथल्या एका मैत्रिणीने ज्योतीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलला. याशिवाय, ती भक्तांच्या गटासह तीनदा पाकिस्तानला गेली होती. ज्योतीविरुद्ध हिसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.