युवा शेतकऱ्यांनी टरबूज पिकातून कमवला लाखोंचा नफा…

चंद्रपूर दि २५– पारंपरिक शेतीला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर येथील प्रशांत शेजवळ या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या 10 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली त्यातून खर्च जाता एकरी 1 लाख रुपये निवळ नफा राहणार असल्याचे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून एकरी 25 टन टरबूज उत्पन्न निघत असल्याने शेतकरी आनंदात आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे टरबूजाची मागणी वाढली असून व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन टरबूज खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दरही चांगला मिळत आहे. यापूर्वी प्रशांत शेजवळ यांनी प्रायोगिक तत्त्वावर दोन एकरात टरबूज लागवड केली होती त्यात त्यांना एकरी खर्च जाता 1लाख रुपये निवळ नफा मिळाला होता. त्यामुळे त्यांनी 10 एकरात टरबूज पिकाची लागवड केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.