इंजिनीयर तरुण शेळी पालन व्यवसायात मिळवतो लाख रुपये

यवतमाळ, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नाही, नोकरी नाही असं ओरडत असतात . मात्र यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील एका उच्चशिक्षित युवकाने ही ओरड आता खोटी ठरवली आहे .मनोज धंदरे नावाच्या या युवकाने BE पर्यंतचे शिक्षण घेतले. Young engineer earns lakhs of rupees in goat rearing business काही दिवस त्याने विदेशात नोकरी केली .मात्र त्याचे मन तेथे रमले नाही आणि तो आपल्या मांगरूळ या गावी परत आला.
त्यानंतर त्याने चक्क शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. मनोजने सुरुवातीला 10 शेळ्या घेऊन हा प्रयोग सुरू केला. यासाठी त्याने तंत्रशुद्ध असे शेड बांधले आणि या शेडमध्येच शेळीपालन सुरू केले आणि पाहता पाहता सदर व्यवसाय भरभराटीला आला. सुरुवातीची गुंतवणूक दहा लाख रुपये इतकी होती आज मनोजचा टर्नओव्हर 24 लाखापर्यंत गेला आहे. यासाठी शेळ्यांची निगा राखणे, स्वच्छता पाळणे त्यांना योग्य तो चारा देणे अशी खबरदारी तो घेत आहे.
परिणामी मनोजला या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे.
उच्चशिक्षित असूनही नोकरी, नोकरी न करता मनोज धंदरेने आपल्या गावातच उद्योग थाटून यशस्वी केला . याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ML/KA/PGB
2 July 2023