आपण आमदारांची बैठक बोलावलीच नाही..
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपण आमदारांची कोणतीही बैठक बोलाविलेली नाही , त्यामुळे याबाबत येत आलेल्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
आपण खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे असे पवार यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी असा खुलासा त्यांनी केला आहे.
गेले काही दिवस आजित पवार हे अस्वस्थ असून ते लवकरच भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत , याशिवाय ते दोन दिवस संपर्क क्षेत्राबाहेर होते अशीही चर्चा होती , यातच त्यांनी आपल्या पक्षातील समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याचे बोलले जात होते या पार्श्वभूमीवर पवारांनी हा खुलासा केला आहे. You have not called a meeting of MLAs..
ML/KA/PGB
17 Apr 2023