मुंबई ते दुबई ट्रेनने जाता येणार! कसं शक्य होणार वाचा!

मुंबई ते दुबई प्रवास भविष्यात ट्रेनने करणं शक्य होणार आहे. या दोन शहरांना थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वेमार्ग उभारण्याची संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) योजना आहे. नॅशनल अॅडव्हायझर ब्यूरो लिमिटेडच्या योजनेनुसार, दुबई आणि मुंबई पाण्याखालील रेल्वे लिंकमुळे प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर येणार आहे. ही अतिवेगवान रेल्वे ताशी ६०० ते १००० किलोमीटर वेगाने धावेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल. हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तरी त्याला मंजुरी मिळाल्याची किंवा त्याच्या विकासाबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.