योग शिक्षिका मंगला पाटील यांनी सलग केला 12 तास योग

 योग शिक्षिका मंगला पाटील यांनी सलग केला 12 तास योग

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): योग शरीरासाठी चांगले असते. नियमित योग केल्याने शरीर स्वास्थ लाभ होत असतात. योगाप्रति नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी नागरिकांनी नियमितपणे योग करावा या उद्देशाने नागपुरातील रहिवासी असलेल्या आणि व्यावसायिक योगशिक्षिका मंगला पाटील यांनी सलग 12 तास योगाचे विविध आसन करून हाय रेंज, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विक्रमाची नोंदणी केलेली आहे.

नुकतेच त्यांना याबद्दल बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड कडून त्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले. नागपुरातील रहिवासी असलेल्या मंगला पाटील मागील अनेक वर्षांपासून नियमितपणे योग करीत आहेत. योगाचे विविध आसन आणि प्रकार त्या करीत असून योगा वर्ग देखील त्या घेत असतात. योगा प्रति नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी सलग 12 तास योगा केला. सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी योग केला, ज्यात त्यांनी योगाची विविध प्रकारची आसने, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कुठली आसने करावीत हे देखील त्यांनी या कालावधीत करून दाखविली. मॉडर्न योगा, पावर योगा, हिल योगा, मेडिटेशन आदी विविध प्रकारचे योगा त्यांनी यावेळी करून दाखविले.

ML/KA/PGB 20 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *