मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ

 मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास एका चरित्र ग्रंथात शब्दबद्ध करण्यात आला असून त्याचे प्रकाशन येत्या १८ तारखेला ठाण्यात राज्यपालांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

नाटककार प्रा डॉ प्रदीप ढवळ यांनी योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचे लेखन केले आहे, एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईक , कुटुंबीय, सहकारी , मित्रमंडळी ,समकालीन राजकारणी , विविध क्षेत्रातील मान्यवर आदींच्या मुलाखती घेऊन हा ग्रंथ लिहिला असून डॉ अरुंधती भालेराव यांनी त्यांना लेखन साहाय्य केलं आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने तो प्रकाशित करण्यात येत आहे. Yoddha Karmayogi biographical treatise on the life of Chief Minister

या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन येत्या १८ तारखेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या मातोश्रींच्या स्मृतिदिनी राज्यपालांच्या हस्ते होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात येईल असं उदय सामंत यांनी ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं , शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के , ग्रंथाली च्या धनश्री धारप , प्रा प्रदीप ढवळ आदी यावेळी उपस्थित होते.

ML/KA/PGB
13 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *