मुंबई आणि उपनगरात येत्या दोन दिवस IMD कडून यलो अलर्ट जारी

 मुंबई आणि उपनगरात येत्या दोन दिवस IMD कडून यलो अलर्ट जारी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परतीचा मान्सून यावर्षी जोरदार फटकेबाजी करत आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. आज देखील मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर दिसत आहे. मुंबई व उपनगरात पुढील ३-४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुढील ४८ तासात मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईत तुरळक ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या मुंबई विभागाने मुंबई आणि शहराच्या काही भागात आज (सोमवारी) संध्याकाळी किंवा रात्री जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने ताज्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील तीन ते चार तासात मुंबईत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *