पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्राला येलो एलर्ट, विजांसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज (16 ऑक्टोबर) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.