यवतमाळ सर्वदूर संततधार पाऊस

यवतमाळ , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात आज सकाळपासूनच संततदार पावसाला सुरुवात झाली आहे .पाऊस संपूर्ण जिल्हाभर पडत असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे .त्यामुळे काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.तर अनेक लघु तथा मध्यम प्रकल्प आजच ओव्हरफ्लो झाले आहेत. बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून धरणाखालील गावातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ML/KA/PGB 21 July 2023