विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे निधन

नागपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदेशी FMCG कंपन्यांच्या गर्दीत विशेषत्त्वाने उठून दिसणारी भारतीय आयुर्वेदीक उत्पादने करणारी कंपनी म्हणजे विको लॅबोरेटरीज. उत्कृष्ट उत्पादनांमुळे विदेशांतही लोकप्रिय ठरलेल्या विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर (85)यांचे काल सायंकाळ नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय व दीप, मुलगी दीप्ती, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. आज सकाळी अंबाझरी घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्याोगिक विश्वात ओळखले जाणारे यशवंत पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला फायदा झाला.ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळानुरूप बदल करीत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत. त्याच्या कारकीर्दीतच कंपनीला ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळाले आहेत.
केशव विष्णू पेंढारकर यांनी ही कंपनी सुरू केली. विकोचे पूर्ण नाव विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी आहे. विको कंपनीची सुरुवात 1952 मध्ये एका छोट्या घरात झाली. पहिले आयुर्वेदिक उत्पादन ‘विको वज्रदंती टूथ पावडर’ तयार करण्यात आले. या उत्पादनासाठी असा दावा करण्यात आला होता की ते 18 औषधी वनस्पतींनी बनलेले आहे.कंपनीची उलाढाल 1955 पर्यंत वार्षिक 10 लाख रुपयांवर पोहोचली होती. परळच्या एका छोट्या गोदामात सुरू झालेल्या या कंपनीचे लवकरच मोठ्या कारखान्यात रूपांतर झाले.
SL/ML/SL
25 May 2024