रायगडावरील उत्खननात सापडले प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण

छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ‘यंत्रराज’ (Yantraraj) म्हणजेच सौम्ययंत्र (Astrolabe) नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आढळून आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खगोलशास्त्रीय अभ्यास करून रायगडाचे बांधकाम तत्कालीन अत्याधुनिक पद्धतीने झाले होते, याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. ‘यंत्रराज’ हे उपकरण प्राचीन काळापासून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी, दिशा शोधण्यासाठी आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जात असे. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांसारख्या खगोलीय गोष्टींचा अभ्यास करणे या यंत्रामुळे सोपे होत असे. रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून रायगडावर विविध ठिकाणी उत्खनन सुरू आहे. यात रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजू, कुशावर्त तलाव , बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि वाडेश्वर मंदिर परिसरातील शिवकालीन वाड्यांच्या अवशेषांचा समावेश आहे. कुशावर्त तलावाच्या वरील भागात आणि पर्जन्यमापक ते वाडेश्वर मंदिरादरम्यानच्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर हे ‘यंत्रराज’ सापडले आहे.
या ‘यंत्रराज’ उपकरणावर काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी कासव किंवा सापासारख्या दोन प्राण्यांचे अंकन आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कोणत्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी उपकरणाच्या वरच्या बाजूला ‘मुख’ आणि ‘पूंछ’ असे शब्द कोरलेले आहेत. यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा ओळखणे सोपे होत असावे, असा अंदाज आहे.
प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे ‘Astrolabe’. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.
भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की, रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास १० ते १२ ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता, त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र (Astrolabe) खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.
या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. या वरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.