ओवेसीविरुद्ध लढणार्या भाजपच्या या महिला उमेदवाराला ‘वाय प्लस’ सुरक्षा
हैदराबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.माधवी लता या मतदारसंघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरुद्ध लढणार असून त्यांना आता गृह मंत्रालयाकडून ‘वाय प्लस’ सुरक्षा जाहीर झाली आहे
गृह मंत्रालयाला मिळालेल्या आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारावर माधवी लता यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.माधवी लता यांच्या सुरक्षेसाठी वाय-प्लस कॅटेगरीमध्ये सशस्त्र पोलीस दलाचे ११ कमांडो तैनात असणार आहेत.तसेच पाच पोलीस त्यांच्या घराजवळ असणार आहेत.त्याचबरोबर ६ पीएसओ तीन शिफ्टमध्ये व्हीआयपी सुरक्षा देतील.
माधवी लता यांची कोणताही राजकीय पार्श्वभूमी नाही. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही राजकीय घराण्यातील संबंधित नाही.त्यांची हिंदुत्ववादी म्हणून ओळख आहे.माधवी या सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याने चर्चेत राहतात. त्या तीन तलाकवरील वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या.त्यामुळे भाजपने त्यांना ओवेसी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुकही केले आहे.
SL/ML/SL
8 April 2024