भारतात लवकरच रंगणार WWE फाईटींग थरार
हैदराबाद, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने (WWE)भारतीय डब्लूडब्लूई (WWE) चाहत्यांसाठी मोठ्या पर्वणीचे आयोजन केले आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्पेक्टेकल रंगणार आहे.भारतीयांना हैदराबादमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा थरार अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये पहिल्यांदाच डब्ल्यूडब्ल्यूई लाईव्ह मॅच रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली आहे.
डब्लूडब्लूई (WWE) चे भारतासह जगभरात लाखो चाहते (WWE Fans) आहेत. 2017 नंतर पहिल्यांदाच भारतीय चाहत्यांना लाईव्ह डब्लूडब्लूई फाईट पाहता येणार आहे. पहिल्यांदाच हैदराबादमध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह फाईटचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने (WWE) दिली आहे. 8 सप्टेंबर रोजी डब्लूडब्लूई लाईव्ह सामने (Live Matches) पाहायला मिळणार आहे. GMC बालयोगी इनडोअर स्टेडियम (GMC Balayogi Indoor Stadium) म्हणजेच गचीबोवली इनडोअर स्टेडियम (Gachibowli Indoor Stadium) मध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह मॅच रंगणार आहे. दरम्यान, 4 ऑगस्टपासून या सामन्याचे तिकीट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार स्पेक्टेकल (WWE Superstar Spectacle) मध्ये भारतीयांसाठी त्यांच्या आवडत्या डब्ल्यूडब्ल्यूई स्टारला पाहण्याची संधी मिळणार असून ही त्यांच्यासाठी खरी पर्वणी ठरणार आहे. वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सेट रोलिन्स (World Heavyweight Champion Seth Rollins), वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियन रिया रिपली (Women’s World Champion Rhea Ripley), डब्ल्यूडब्ल्यूई टॅम टीम चॅम्पियन्स (Undisputed WWE Tag Team Champions ) समी झायन (Sami Zayn) आणि केविन ओन्स (Kevin Owens), इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन (Intercontinental Champion) गंथर (The Ring General GUNTHER), जिंदर महाल (Jinder Mahal), वीर महान (Veer Mahan), सांगा (Sanga), ड्र्यू मॅकइन्टायर (Drew McIntyre), बेकी लिंच (Becky Lynch), नताल्या (Natalya), मॅट रिडल (Matt Riddle), लुडविग कैसर (Ludwig Kaiser) यासारख्या आणखी डब्ल्यूडब्ल्यूई स्टार्संना भारतात लाईव्ह मॅचमध्ये पाहता येणार आहे.
SL/KA/SL
1 Aug 2023