WTO च्या बैठकीत भारताच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : WTO च्या मंत्रिपरिषदेची १३ वी बैठक आज पार पडली. . या परिषदेत भारतातर्फे मांडल्या गेलेल्या तसेच उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली गेली. भारताने मांडलेल्या समस्या केवळ स्वतःसाठी नसून सर्व विकसनशील तसेच अल्प विकसित देशांच्या वतीने त्या मांडल्या गेल्यामुळे भारताच्या भूमिकेला वजन प्राप्त झाले. यामुळे ही परिषद भारतासाठी यशस्वी झाल्याचा दावा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी परिषदेनंतर रात्री पत्रकारांशी बोलताना केला.
अनेक संवदेनशील प्रश्नांना जागतिक व्यापार संघटनेच्या मागील मंत्रिपरिषदांमध्ये स्पर्श केला गेला नव्हता. या परिषदेत त्या प्रश्नांचा विचार केला गेला.
देशातील शेतकरी, मच्छिमार यांच्या हितासाठी केलेल्या मागण्यांचाही गांभीर्याने विचार केला गेला. सरकारी स्तरावर धान्याची खरेदी (पब्लिक स्टॉक होल्डिंग) किती प्रमाणात केली जावी याविषयी परिषदेत तणाव निर्माण झाला होता. भारताने याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केल्याचे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. मात्र या परिषदेत कृषी आणि मत्स्य उद्योगांबाबत ठोस निर्णय होऊ शकले नाहीत.
व्यापारविषयक प्रश्न सोडवण्यासाठी एक अपिलेट असावे या मागणीचा भारताने पुनरुच्चार केला आहे. अशा प्रकारे तक्रारींची दखल घेणारी रचना तयार केल्यास त्याचा फायदा विकसनशील तसेच अल्प विकसित देशांना होईल, असा दावाही भारताने या परिषदेत केला.
मत्स्य व्यवसाय जगभरात वाढीस लागावा यासाठी जागतिक व्यापार संघटनेत काही निर्णय घेण्यासाठी चर्चा झाल्या. परंतु यामध्ये विशेषतः मत्स्य उद्योगासाठी किंवा मासेमारीसाठी दिली जाणारी सबसिडी तसेच काही संज्ञा याबाबतही भारताला संदिग्धता आढळून आली. मात्र ही संदिग्धता याचार दिवसांच्या परिषदेत दूर करता येणे शक्य नसल्याचे व त्यासाठी आणखी मासेमारी व्यवसायाचा सखोल अभ्यास गरजेचा असल्याचे प्रतिपादन भारताततर्फे करण्यात आले.
SL/KA/SL
4 March 2024