हॉल तिकीटावर चुकीचा पत्ता, तरुणी मुकली MHT – CET परीक्षेला
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून राज्यात एमएचटी सीइटीच्या परीक्षांना सुरुवात झालीय. जालन्यात CET सेलच्या निष्काळजीपणाचा फटका महाविद्यालयीन तरुणीला बसला आहे. परीक्षेच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता छापला गेल्याने जालन्यात तरुणीला पेपर देण्यापासून अडवल गेलं.
घनसावंगी तालुक्यातील गुरुपिमप्री येथे राहणारी सपना कोल्हे ही तरुणी 12 नंतरच्या सीईटीच्या परीक्षेला बसली होती. आज या तरुणीचा सीईटचा पेपर होता. मात्र तिच्या हॉल तिकिटावर छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी जवळील कुंभेफल या ठिकाणचा परीक्षा केंद्राचा पत्ता छापला गेला होता. परीक्षा देण्यासाठी सपना ही तरुणी सदर ठिकाणी गेली, मात्र त्या ठिकाणी विचारपूस केल्यानंतर तिचे परीक्षा केंद्र जालन्याच्या नागेवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आले असल्याचं तिला कळले.
त्यावरून तरुणीने परीक्षा देण्यासाठी जालना गाठले मात्र तिला परीक्षा केंद्रावर 5/10 मिनिट उशीर झाल्याने, तिला परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास अडवण्यात आलं. त्यामुळे राज्याच्या सीईट सेल च्या निष्काळजीपणाचा फटका या महाविद्यालयीन तरुणीला बसलाय. मी 2 वर्ष अभ्यास केला, मात्र मला आज परीक्षेला बसू न दिल्याने माझे वर्ष वाया जाईल, त्यामुळे आता मी करू तरी काय असा सवाल या तरुणीने विचारलाय.
ML/ML/SL
22 April 2024