पै. सूरज मानेची महाराष्ट्र केसरीत रौप्य पदकाची कमाई
मुंबई दि २१ : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन वाघोली जि.पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे . या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि बापू लाड मिशन ऑलिंपिक चे दत्तक मल्ल सूरज माने याने नेत्रदीपक कामगिरी बजावत रौप्य 🥈पदकाची कमाई केली.
पै.सूरज माने याने ७९ किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी मध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याची पहिली लढत बुलढाण्याच्या शुभम आवरे सोबत झाली ही कुस्ती १०-० अशा गुण फरकांनी आपल्या नावे केली. दुसऱ्या फेरीत त्याची लढत छ.संभाजी नगर च्या चरण मेघवाल सोबत झाली ही कुस्ती सूरज ने १२-०१ च्या गुणांनी जिंकली , तिसऱ्या फेरीत सूरज ची कुस्ती कोल्हापूरच्या पृथ्वीराज बोडके सोबत झाली ही कुस्ती सूरज ने ५-२ अशा गुणांच्या बढतीने जिंकली . चौथ्या फेरीत मात्र त्याचे आव्हान सोलापूर शहर च्या तगडा मल्ल गोपीनाथ सुतार सोबत होती पहिल्या तीन मिनिटात गोपीनाथ आघाडीवर होता ४-० असा गुण फलक होता, कुस्तीच्या शेवटच्या दीड मिनिटा मध्ये सूरज ने आक्रमक खेळा चे प्रदर्शन करता ८-४ अशा चार गुणांच्या फरकाने अंतिम सामन्यात प्रवेश केला .
सूरज चा अंतिम सामना सोलापूर जिल्ह्याच्या विकास करे सोबत झाला मात्र अंतिम सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले व रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या समक्ष त्याला पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे , रामकृष्ण सातव पाटील यांच्या तर्फे स्प्लेंडर मोटार सायकल देऊन सूरज चा गौरव करण्यात आला.
राज्यस्तरावरील सूरज चे हे दुसरे पदक आहे , सूरज सध्या अभिनव कॉलेज मध्ये कला शाखेतील तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला आखाड्याचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील व कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
ML/ML/SL