WPL 2025 मध्ये मुंबईच्या खेळाडूला मिळाली सर्वाधिक रक्कम

 WPL 2025 मध्ये मुंबईच्या खेळाडूला मिळाली सर्वाधिक रक्कम

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

IPL२०२५ स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागली. दरम्यान वुमेन्स प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव बंगळुरुत सुरु आहे.या लिलावात मुंबईकडून खेळणाऱ्या सिमरन शेखवर रेकॉर्डब्रेक बोली लागली आहे. ती या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. या लिलावात गुजरात जायंट्सने तिला तब्बल १ कोटी ९० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

सिमरन शेख ही युवा फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करते. गेल्या हंगामात ती युपी वॉरीयर्सकडून खेळताना दिसून आली होती. आगामी हंगामात ती गुजरात संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.सिमरनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीमुळे तिची डिमांड वाढली आहे. मात्र गेल्या हंगामात तिला आपली छाप सोडता आली नव्हती. गेल्या हंगामात फलंदाजी करताना तिने ९ सामन्यांमध्ये अवघ्या २९ धावा केल्या होत्या. आगामी हंमामात तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

गुजरातने या लिलावात २ स्टार खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे. या लिलावात गुजरातने वेस्टइंडीजची अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटीनला १ कोटी ७० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. यासह सिमरन शेखला १ कोटी ९० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

SL/ ML/ SL

15 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *