श्री अंबाबाईची महिषासुर मर्दिनी स्वरूपातील पूजा…
कोल्हापूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा नववा दिवस पण तिथी अष्टमी. आजच्या तिथीला जगदंबेने अष्टादशभूजा म्हणजे 18 हातांचे विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी नवरात्र महाष्टमीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते.
आज या पूजेत जगदंबेचे थोडसं वेगळं रूप साकारण्यात आले आहे. महिषोत्तमांग संस्थिता म्हणजे महिषासुराचे उत्तम अंग अर्थात त्याचे मस्तक त्याच्यावर विराजमान असं हे जगदंबेचे महिषासुराच्या मस्तकावर पाय रोवून उभी राहिलेली सर्व देव वरदायिनी अशी जगदंबा आज साकारण्यात आली आहे. करवीर शक्तिपीठ देवता म्हणून महिष मर्दिनी या देवतेचा उल्लेख येतो. 51 शक्तिपीठाच्या यादीत कोल्हापूरला सतीचे त्रिनेत्र पडले आणि तिथे महिषमर्दिनी नावाने देवी आणि क्रोधीश भैरव नावाने भैरव विराजमान असल्याचे सांगितले जाते.
SL/ML/SL 11 Oct.2024