पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा

 पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा

पंढरपूर, दि. १० : राज्यात विविध ठिकाणी मराठी भाषेची हिंदीकडून गळचेपी सुरु असण्याचे प्रकार घडून येत आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे आता पंढरपूरच्या विठूरायाच्या गाभाऱ्यातही हिंदीचा प्रवेश झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. आता थेट मंदिरात हिंदीतून पूजा झाल्याचे समोर आल्यानंतर वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते. मात्र फक्त एका कुटुंबासाठी हिंदी भाषेत पूजा करण्यात आली, असा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे केला आहे. हा दावा करताना सातपुते यांनी मोठी पोस्ट लिहिली असून मी हे प्रकरण लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राहुल सातपुते यांनी पंढरपूर मंदीर समितीकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीला मंदीर समितीने प्रतिसाद दिला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. चौकशी करून आम्ही योग्य ती कारवाई करू, असे या मंदीर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच यापुढे मंदिरात मराठी भाषेतूनच पूजा केली जाईल, अशी माहिती पंढरपूर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची तुळशीपूजा होती. त्याचे सर्व स्त्रोत हे संस्कृत भाषेत असतात. मात्र तुळशीपूजा सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती ही मराठी भाषेतून सांगितली जाते. परंतु 9 ऑगस्ट रोजी एक अमराठी कुटुंब आले होते. त्या कुटुंबाला आम्हाला याबाबतची माहिती हिंदी भाषेतून दिली जाईल का? अशी विचारणा केली होती. आपल्याकडे सर्व पूजा मराठीतूनच होतात. आपण हिंदी भाषेतून कुठलीही पूजा करत नाही. भाविकाला मराठी समजत नसल्यामुळे आपण फक्त पूजेची माहिती हिंदीतून दिली, असे राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *