ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव

 ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव

बीड, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बीड जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.Worm infestation of gram and sorghum crops due to cloudy weather

बीड जिल्ह्यात 3 लाख 44 हजार 832 रब्बी पिकाखाली पेरणीचे क्षेत्र आहे. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे विहिरी, कुपनलिकेला पाणी आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आली होती. यात जिल्ह्यात 1 लाख 65 हजार 335 हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. तर 1 लाख 28 हजार 751 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.

मागील तीन चार दिवसापासून जिल्ह्यात धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा तर ज्वारी पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

पिकांची चांगली वाढ झाली असली तरी सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि हवामान बदलाचा फटका पिकांना बसत असून हरभऱ्यावर imomectin benzil चार ते सहा ग्राम प्रति दहा लिटर पाणी आणि साफ म्यानकोझिमो अधिक karbendizam बुरशीनाशक असून प्रति दहा लिटर पाणी घेऊन फवारणी करण्याची गरज असून हरभरा पिकात कामगंध सापळे बसवण्याची गरज आहे तर ज्वारीवर कीटकनाशक फवारणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे.

ML/KA/PGB
8 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *