वरळीच्या विद्यार्थिनीने मिळवला मुंबईतून सर्वप्रथम येण्याचा मान !

मुंबई, दि 15
लोअर परळच्या ‘लक्ष्य ॲकेडमीची‘ विद्यार्थिनी कु. अक्षरा वर्मा हिने दहावी – २०२५ परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून ९७.०० % गुणांसह सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिच्या घरी जाऊन आमदार सुनिल शिंदे यांनी तिची व कुटुंबीयांची भेट घेतली व तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
बेताच्या आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करीत अतिशय सामान्य कुटुंबातील या मुलीने प्रचंड मेहनत व जबरदस्त इच्छाशक्ती जोरावर मिळवलेले यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी माझे सहकारी व ‘लक्ष्य ॲकेडमीचे संचालक श्री. प्रसाद सावंत व प्रिया सावंत, वरळी विधानसभा संघटक निरंजन दत्ताजी नलावडे, पंकज सुर्वे व विनोद निकम व स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.
KK.MS