शिवसेनेच्या वरळी येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिवसेनेच्या वरळी येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २९
शिवसेना वरळी विधानसभा आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या मार्गदर्शना खाली वरळी सनविले हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी य रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 900 पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिरात विभागातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले. यामध्ये महिलांचा सहभाग सर्वाधिक होता.आम्ही दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. यामुळे गरजू रुग्णाला शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा अत्यावश्यक वेळेला सहज रक्त उपलब्ध व्हावे. तसेच लोकांना रक्तदानाचे महत्त्व समजावे आणि त्यातून जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याची माहिती शिवसेनेचे वरळी विधानसभा प्रमुख, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वरळी विधानसभा संबंधित प्रशांत गवस, महिला विधानसभा प्रमुख रत्ना महाले, संतोष पांडे, महिला प्रमुख पूजा चौहान आणि सर्व शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतली. इलेक्ट्रॉन शिबिरामध्ये विभागातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचे देखील लोकार्पण करण्यात आले. विभागातील अनेक मान्यवर मंडळींनी तसेच विविध सामाजिक संस्थांनी, मंडळांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन या कार्यक्रमाचे कौतुक केले.

KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *