वरळी सेंच्युरी मिल म्हाडा संकुलातील समस्यांमुळे नागरिक हैराण
मुंबई, 4
वरळी सेंच्युरी मिल म्हाडा संकुल येथे रहिवाशांना पिण्याच्या पाणी, लाईट, ड्रेनेज बाबत तसेच इतर सुविधा याबाबत अनेक तक्रारी भेडसावत होत्या. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदे यांना निवेदन देऊन या समस्या सोडवण्याबाबत तक्रार केली होत्या. या समस्या आणि अडचणीं सोडवण्याबाबत महानगरपालिका, म्हाडा तसेच एम एम आर डी एमच्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, तक्रारी व गरजा समजून घेण्यात आल्या आणि त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्यात आल्याची माहिती नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी दिली. या पाहणीदरम्यान आमदार सुनील शिंदे आणि इतर स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS