वरळी येथील शिवसेना (उबठा)निर्धार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २७
वरळी येथील शिवसेनेचा निर्धार मेळाव्याचे आयोजन आज वरळी येथील एनएससीआय डोम येथे करण्यात आले होते. परंतु पावसामुळे या ठिकाणी शिवसैनिक जमतील की नाही याची खात्री नव्हती. संध्याकाळच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता त्यामुळे या निर्धार मेळाव्यावर पावसा मुळे गर्दी ओसरते की काय असा प्रश्न येथील आयोजकांच्या मनात होता. परंतु पाऊस पडत असून देखील शिवसैनिक मोठ्या संख्येने या निर्धार मेळाव्याला उपस्थित राहिले. विशेष करून महिला देखील पावसामध्ये छत्री घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या. तर काही महिला पावसामध्ये भिजत येऊन मेळाव्याला उपस्थित राहून आपण शिवसेनेसोबत आहोत हा निर्धार व्यक्त केला. कारण की एका महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन याच ठिकाणी केले होते. तेव्हा त्यांनी मुंबई आम्ही जिंकणारच असे वक्तव्य केले होते. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.
आम्ही सदैव शिवसेनेसोबतच आहोत. अनेक वेळा संकट आले पण ही शिवसेना त्या संकटाला तोंड देऊन मात करून पुढे चालतच राहिले. आमची ही निष्ठा शिवसेने सोबत असून यापुढे देखील आम्ही शिवसेनेसोबतच राहू अशी माहिती ज्येष्ठ महिला शिवसैनिक विठाबाई चव्हाण यांनी या निर्धार मेळाव्यामध्ये दिली.KK/ML/MS