आमदार सुनील शिंदे यांनी वरळी येथील मार्कंडेश्वर मंदिराची केली पाहणी
मुंबई, दि १९
तेलगू पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेश्वर महामुनी यांचे वरळी बीडीडी चाळ परिसरातील श्री. मार्कंडेश्वर देवस्थानम या नव्याने बांधण्यात येणाऱ्या मंदिराची केली पाहणी. यावेळी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनी, म्हाडा अधिकारी तसेच मंदिर देवस्थानम समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत मंदिर विश्वस्त समितीने सुचवलेले बदल आणि आधुनिक सोयी-सुविधांसह मंदिर अधिक भव्य व भक्तांसाठी सोयीस्कर स्वरूपात उभारण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी या अधिकाऱ्यांना दिल्या. हे मंदिर फार जुने असून या मंदिरा सोबत लोकांच्या भावना जोडलेले आहेत. या मंदिराचे काम अतिशय सुसह्य आणि प्रभावशाली म्हणून लोकांना त्याचा चांगला उपयोग होईल अशा पद्धतीने या मंदिराचे बांधकाम काढण्याचे सूचना केल्या आहेत. वरळीमध्ये पद्मशाली समाज मोठ्या संख्येने राहतो त्यांची आस्था या मंदिरा सोबत जोडलेली असून या मंदिराचे बांधकाम योग्य प्रकारे आणि सुसज्ज होईल अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी दिली.
या वेळी श्री. मार्कंडेश्वर देवस्थानम ट्रस्टचे चेअरमन रमेश मंथेना, सचिव कैलास एकलदेवी, विश्वस्त मधू भोजा, कृष्णा हरीस्वामी, मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष सिरिमल्ला श्रीनिवास, श्रीहरी वासाला, हरिप्रसाद कस्तुरी आदी मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS