तब्बल 19 हजार रुपये किमतीचा जगातील सर्वात महाग आंबा

टोकियो, ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या आंब्याच्या मोसमामध्ये बाजारात विविध जातींचे आंबे उपलब्ध आहेत. आंब्याचे बरेच प्रकार आहे. तुम्ही किती तरी प्रकारचे आंबे खाल्ले असतील. आंब्याच्या प्रकारानुसार त्यांची किंमतही असते. अगदी सिझनच्या सुरुवातीला २ ते ३ हजार रु डझन पर्यंत भारतीय बाजारात आंब्याचा भाव जातो. पण जगातील सर्वात महागडा आंबा जपानमध्ये पिकवला जातो हे तुम्हाला माहित आहे का? हा एक आंबाच तब्बल 19 हजार रुपयांचा आहे. जपानच्या सर्वात उत्तरेकडील बेटावरील बर्फाळ प्रदेशात हा आंबा पिकवला जातो. सिक्रेट पद्धतीने या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं.
62 वर्षांचे हिरोयुकी नाकागावा जपानच्या होक्काइडो बेटावरील ओटोफुके येथील त्याच्या शेतात ग्रीनहाऊसमध्ये हे आंबे पिकवतात. शाश्वत शेतीच्या प्रयोगातून एक दिवस जगातील सर्वात महागडा आंबा मिळेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पूर्वी पेट्रोलियम कंपनी चालवणारे नाकागावा म्हणतात, “होक्काइडो इथून मला निसर्गातून काहीतरी नैसर्गिक बनवायचं होतं. सुरुवातीला कोणीही मला गांभीर्याने घेतलं नाही.”
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नाकागावा 2011 पासून जपानच्या उत्तरेकडील बेटावरील बर्फाळ टोकाची प्रदेशात आंबा पिकवत आहे. हा प्रति आंबा $230 या भावाने विकतो. हा आंबा सामान्य आंब्यापेक्षा खूपच गोड आणि रसाळ असल्याचा दावा नाकागावा करतात. 2014 मध्ये डिपार्टमेंटल स्टोअर Isetan ने टोकियोमधील शिंजुकू स्थानावर त्याचा एक आंबा विक्रीसाठी ठेवला आणि तो सुमारे $400 मध्ये विकला.
मियाझाकीच्या दक्षिणेकडील प्रांतातील आणखी एका आंबा शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, ज्याने हिवाळ्याच्या महिन्यांत फळं पिकवणं शक्य असल्याचा दावा केला होता. नाकागावाने त्याचं फार्म तसंच त्याचा स्टार्टअप नोरावर्क्स जपानची स्थापना केली. काही वर्षांनंतर त्याने त्याच्या आंब्याचा ब्रँड हाकुगिन नो तैयो म्हणून ट्रेडमार्क केला, ज्याचा अर्थ बर्फात सूर्य असा होतो.
SL/KA/SL
12 May 2023