जगातील सर्वांत मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक
हवाई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी मौना लाओचा सोमवारी हवाईमध्ये उद्रेक सुरू झाला. 38 वर्षांनंतर झालेल्या या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे संपूर्ण आकाश लाल झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला होता. त्यानंतर आपत्कालीन दलाला तैनात ठेवण्यात आले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून निघालेला मलबा फार दूर गेला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचे नुकसान झालेली नाही.
हवाई बेटावर 6 जागॉत ज्वालामुखी आहेत. त्यापैकी मौना लाओ हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मानला जातो. भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, मौना लाओ 1843 पासून सुमारे 33 वेळा उद्रेक झाला आहे. याआधी 1984 मध्ये मौना लाओ चा उद्रेक झाला होता. त्यावेळी 7 किलोमीटर परिसरात सलग 22 दिवस लाव्हा रस वाहत होता.
world’s largest active volcano Mauna Loa eruption started
SL/KA/SL
29 Nov. 2022