जगातील पहिला लाकडी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत
टोकियो, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील पहिले लाकडी सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत झाला आहे. या सॅटेलाईटचे नाव ‘लिग्नोसॅट’ असे आहे. एखाद्या कॉफी कपच्या आकाराचा हा उपग्रह मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये हा पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून सोडण्यात आला होता. त्याबाबतची घोषणा नुकतीच ‘नासा’ने केली आहे. हा उपग्रह जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ‘जाक्सा’ने विकसित केला आहे.त्याला अंतराळात अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सोडले.
अंतराळ उड्डाण अधिक किफायतशीर बनवण्याच्या उद्देशाने तसेच अंतराळ कचर्याची समस्या दूर करण्यासाठी असा लाकडी उपग्रह बनवण्याचा हा प्रयोग केला आहे. अंतराळाच्या पोकळीत लाकूड जळत नाही किंवा खराबही होत नाही. मात्र ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्याची जळून राख होते.त्यामुळे भविष्यातील बायोडिग्रेडेबल उपग्रह बनवण्यासाठी हा एक चांगला उपाय ठरू शकतो. २०२४ च्या प्रारंभीच त्यासाठीच्या लाकडांच्या नमुन्यांचे अंतराळ स्थानकावर परीक्षण करण्यात आले होते. त्यामधून लाकडी उपग्रहासाठी योग्य लाकूड निवडण्यात आले. या परीक्षणासाठी तीन प्रकारचे लाकूड पाठवण्यात आले होते. ही तिन्ही प्रकारची लाकडे अंतराळात टिकून राहतात असे दिसले.

SL/ML/SL
14 Jan. 2025