माऊंट एव्हरेस्ट समाेर विश्वविक्रमी स्कायडायव्हिंग जंप

 माऊंट एव्हरेस्ट समाेर विश्वविक्रमी स्कायडायव्हिंग जंप

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विक्रम करणाऱ्या पुण्यातील पदमश्री शीतल महाजन(राणे) हिने रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने जगातील सर्वाच्च शिखर असलेल्या नेपाळ स्थित माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी) उंचीवरुन हेलिकाॅप्टर मधून स्कायडायव्हिंग जंप करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. जगातील दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव आणि माऊंट एव्हेरस्ट समाेर येथे पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन यशस्वी लँडिंग करणारी ती पहिली महिला ठरली आहे. त्याचप्रमाणे माऊंट एव्हरेस्ट समाेर पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला ती ठरलेली आहे.

सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला आणि सर्वात उंच ध्वज स्कायडायव्हिंग महिलांनी केल्याचा मान मिळवत तिने तीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहे.
याबाबत शीतल महाजन (राणे) म्हणाली, माऊंट एव्हरेस्टच्या समाेर पॅराशूट जंप करण्याचे स्वप्न मी सन २००७ मध्ये प्रथम पहिले आणि आज ते प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आहे. माऊंट एव्हरेस्ट समाेर २३ हजार फूट उंचीवरुन एएस ३५० बी-३ या हेलिकाॅप्टर मधून उडी मारल्यावर १८ हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडण्यात आले.

माऊंट एव्हरेस्ट सर करताना तीन महत्वाचे टप्पे समजले जातात. स्यंगबाेचे (१२,४०२ फूट), अमादाबलम बेस कॅम्प (१५,००० फूट) आणि कालापत्थर (१७,५०० पूट) या ठिकाणी मुख्य माऊंट एव्हरेस्ट जंप करण्यापूर्वी तीन पॅराशूट जंप करण्यात आली. याकरिता सदर उंचीवर २६० ते ४०० चाैरस फूटाचे माेठया आकाराचे पॅराशूटचा वापर करण्यात आला. बर्फाच्छादित हिमालयातील हवामानाचे स्वरुप गतिमान आणि सतत बदलत असते.
आतापर्यंतच्या प्रत्येक एव्हरेस्ट माेहिमेची याेजना अत्यंत अनुकूल हवामानाच्या अनुषंगाने आखण्यात आली तरी ऐनवेळी हवामानात बदलत हाेतात ते मला अनुभवयास आले. या अती उंचीवरील स्कायडायव्हिंगसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. त्यादृष्टीने पाॅल हेन्री डी बेरे, ओमाल अलहेगेलन, वेंडी स्मिथ, नादिया साेलाेव्येवा यांची साथ लाभली.

एक्सप्लाेर हिमालय या स्कायडायव्हिंगचे संस्थापक सुमन पांडे यांनी नेपाळमध्ये सहकार्य केले. आतापर्यंत काेणत्याही भारतीय महिला स्कायडायव्हरने माऊंट एव्हरेस्ट परिसरात स्कायडायव्हिंग केले नव्हते ही विक्रम करण्याची संधी मला यारुपाने मिळाली. रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी, अंनत अंबानी यांनी आर्थिक पाठबळ दिले. तर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अशाेक जैन, एराे इंडिया क्लब इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी, खासदार प्रशांत बाघ यांनी सहकार्य केले. तर पंतप्रधान नरेंद्र माेदी तसेच केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्याेतिरादित्य सिंधीया यांनी प्राेत्साहित केले. त्याचसाेबत माझी आई ममता महाजन, भाऊ हर्षल महाजन, पती वैभव राणे आणि मुले वैभव, वृषभ यांनी घरातून पाठबळ दिल्याने आजचा विक्रम प्रस्थापित करु शकले आहे. त्याचप्रमाणे माझे दिवंगत वडील कमलाकर महाजन यांनी मला माऊंट एव्हरेस्ट माेहिमेसाठी सातत्याने प्राेत्साहित केले हाेते. आज त्यांचे स्वप्न पूर्ण करु शकल्याचा आनंद आहे.

ML/KA/SL

14 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *