समुद्रात अखंड पोहण्याचा जागतिक विक्रम -11 दिवस,22 तास,13मिनिटे
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली वसई विरार ओपन वॉटर सी स्विमिंग फाऊंडेशनतर्फे अनोखी आणि साहसी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. १७ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई ते गोवा आणि वसई किल्ल्यापर्यंत ११०० किमी अंतरावरील जगातील सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिले ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रयत्नाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘जागतिक सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिले’ म्हणून केली जाईल. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार मागील विक्रम टीम सी हॉक्सने १०३१ किमी नोंदवला होता.
वसईतील सहा तरुण जलतरणपट्टूंनी गेट वे ते गोवा आणि गोवा ते वसई असा सागरी १ हजार १०५ किलोमीटर पोहण्याचा जागतिक विक्रम केला. याआधीचा विक्रम परदेशी जलतरणपट्टूंनी केला होता. पण, ते सर्वजण ३५ वर्षे वयोगटातील होते. तर नवा विक्रम रचणारे वसईकर जलतरणपट्टू हे अवघ्या पंचवीसीतील आहेत.
या रिले संघात भारताकडून संपन्ना शेलार (२१ वर्षे), जिया राय (१४ वर्षे), कार्तिक गुगळे (२१ वर्षे), राकेश कदम (२४ वर्षे), राज पाटील (१७ वर्षे) आणि दुर्वेन नाईक (१७ वर्षे) यांचा समावेश आहे. मिस जिया राय या संघातील सर्वात तरुण आणि एकल महिला सहभागी आहेत. नेव्ही ऑफिसर आयएनएस कुंजली MC-At-Arms II मध्येअसलेले मदन राय यांची मुलगी मिस जिया राय ही या संघात सर्वात लहान भाग घेणारी स्पर्धक होती.
या सहा जलतरणपटूंनी गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते डोना पॉला (गोवा) आणि परत वसई किल्ल्यापर्यंत रिले पद्धतीने पोहून एकूण 1105 किमी आणि 450 मीटर अंतर 11 दिवस 22 तास आणि 13 मिनिटे 4 सेकदांनी पूर्ण केले. या मोहिमेत मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथून दि. 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी सुरुवात झाली होती. आणि गुरुवार दि. 29 डिसेंबरला दुपारी 1.45 मिनिटांनी त्याचा समारोप झाला. आतापर्यंत विश्वातला कॅलिफोर्निया येथील 2019 मध्ये 959 किमी पोहण्याचा विक्रम मोडीस वसईकरांनी मोडीत काढला आहे.
यापूर्वी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, यूएसए येथे 2019 मध्ये 959 किमी पोहण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला होता. मात्र त्या विक्रमात वयोगट हा 35 वर्षे होता. मात्र, नवा विक्रम प्रस्थापित करणारे वसईतील सहाही जण 25 वर्षाच्या खालच्या वयोगटात मोडत आहेत. हे विशेष आहे. विशेष म्हणजे त्यांनी अगदी कमी दिवसात हा विक्रम केला आहे. सहाही जलतरणपटूंनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा व मोहीमांमध्ये अनेक लांब अंतरावरील खुल्या पाण्यात पोहण्याचेही विक्रम केले आहेत.
SL/KA/SL
1 Jan 2022