जगप्रसिद्ध फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचे निधन

 जगप्रसिद्ध फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचे निधन

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय फिरकी गोलंदाजांना जगभरात ओळख मिळवून देणारे महान गोलंदाज बिशन सिंग बेदी (७७) यांचे आज निधन झाले. भारतीय संघाकडून १९६६ ते १९७७ या कालावधीत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले होते. या २६६ कसोटी सामन्यांमध्ये बेदी यांनी २६६ बळी मिळवले. त्याचबरोबर बेदी हे १० वनडे सामनेही खेळले होते. या १० वनडे सामन्यांमध्ये बेदी यांनी सात बळी मिळवले होते. पतौडी यांच्यानंतर बेदी यांच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.. कर्णधार म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली.

बेदी यांनी प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या साथीने जगाला आपल्या फिरकी गोलंदाजीची झलक दाखवली. भारतीय संघ जेव्हा १९७८ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या अद्भुत गोलंदाजीने पाकीस्तानी फलंदाजांना हैराण केले होते. डावखुऱ्या गोलंदाजीची फिरकी गोलंदाजी कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ हा बेदी यांनी दाखवून दिला होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा दबदबा होता.

बेदी यांच्या निधनाबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोकसंदेशाच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ” भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी राहिले नाहीत. हे क्रिकेटचे मोठे नुकसान आहे,” बेदी, बीएस चंद्रशेखर, एस. वेंकटराघवन आणि एरापल्ली प्रसन्ना हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या इतिहासातील क्रांतीचे अभियंते मानले जातात. त्यामधील बेदी यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूने आज जगाचा निरोप घेतला आहे.

SL/KA/SL

23 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *