जगप्रसिद्ध पॉप स्टार शकीरा पुन्हा भारत दौऱ्यावर

 जगप्रसिद्ध पॉप स्टार शकीरा पुन्हा भारत दौऱ्यावर

मुंबई, दि. 24 : आपल्या ठराविक शैलीतील डान्स आणि आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी जगप्रसिद्ध पॉप स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका शकिरा पुन्हा एकदा भारतात येत आहे. शकिरा एप्रिल महिन्यात मुंबई आणि दिल्लीत भव्य कॉन्सर्ट करणार आहे. ‘फीडिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि झोमॅटोच्या ‘डिस्ट्रिक्ट’ प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे तिकीट बुकिंग केवळ झोमॅटोच्या ‘डिस्ट्रिक्ट’ ॲपवर उपलब्ध असेल.

शकिराचा हा भारत दौरा केवळ मनोरंजनासाठी नसून एका सामाजिक हेतूने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:

मुंबई: 10 एप्रिल 2026 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे हा कार्यक्रम पार पडेल.
दिल्ली: 15 एप्रिल 2026 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शकिराचा परफॉर्मन्स होईल.

‘फीडिंग इंडिया कॉन्सर्ट 2026’ ही या कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आहे. देशातील भूक आणि कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

“भारतात परफॉर्म करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. प्रत्येक मुलाला योग्य पोषण मिळावे यासाठी एकत्र उभे राहणे ही काळाची गरज आहे,” अशा शब्दांत शकिराने आपला आनंद व्यक्त केला. 2030 पर्यंत ‘झिरो हंगर’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही एक मोठी मोहीम राबवण्यात येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *