उद्यापासून आठवडाभर राजधानीत विश्व पुस्तक मेळा

 उद्यापासून आठवडाभर राजधानीत विश्व पुस्तक मेळा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या थंडीने कुडकुडणाऱ्या राजधानी दिल्लीकरांना उद्यापासून आठवडाभर जागतिक साहित्याच्या मेळ्याची मेजवानी अनुभवता येणार आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 10 ते 18 फेब्रुवारी दरम्यान हॉल क्रमांक 1 ते 5 मध्ये जागतिक पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत तो पुस्तकप्रेमींसाठी खुला राहणार आहे. प्रगती मैदानाच्या गेट क्रमांक 4, 6 आणि 10 वरून वाचकांना पुस्तक मेळाव्यात पोहोचता येणार आहे. जागतिक पुस्तक मेळा दरवर्षी आयोजित केला जातो आणि दरवर्षी त्याची थीम वेगळी असते. यावेळी मेळ्याची थीम ‘बहुभाषिक भारत एक जिवंत परंपरा’ अशी ठेवण्यात आली आहे. ज्याद्वारे भारताची सांस्कृतिक समृद्धता आणि भाषिक वैविध्य यावेळी दाखवण्यात येणार आहे.

सौदी अरेबिया हा यावर्षीच्या पुस्तक मेळ्याचा पाहुणा देश आहे. तसेच युनायटेड किंग्डम, फ्रान्स, स्पेन, तुर्की, इटली, रशिया, तैवान, इराण, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रिया, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यासह इतर अनेक देश या पुस्तक मेळ्यात सहभागी होत आहेत. नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. यात नाटक, लोककला, संगीत, बँड परफॉर्मन्स यांचा समावेश आहे.

या पुस्तक मेळ्याला पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन सर्वोच्च न्यायालय आहे, तेथून प्रगती मैदान गेट 10 वरून शटल सेवा उपलब्ध असेल. वाचकांच्या सोयीसाठी, दिलशाद गार्डन, रिठाला, जीटीबी नगर, विश्व विद्यालय, काश्मिरी गेट, राजीव चौक, नोएडा सेक्टर-52, नोएडा सिटी सेंटर, बोटॅनिकल गार्डन, वैशाली, इंद्रप्रस्थ, सर्वोच्च न्यायालय, मंडी हाऊस, कीर्ती नगर, द्वारका, मुनिरका, आयटीओ, आयएनए, हौज खास अशा एकूण 20 मेट्रो स्थानकांवर तिकीट काउंटर बनवण्यात आले आहेत. तुम्ही येथून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअरची तिकिटे खरेदी करू शकता. गेल्या वेळी हा मेळा 25 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

SL/KA/SL

9 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *