समाजविघातक प्रवृत्ती संपवण्याचे काम करावे लागेल

 समाजविघातक प्रवृत्ती संपवण्याचे काम करावे लागेल

सातारा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाहीला मारक ठरणारे समाजविघातक प्रवृत्ती सध्या डोके वर काढत आहेत , त्या विचारांची सरकारे ही अस्तित्वात आहेत त्यामुळे ते संपविण्याचा प्रयत्न करावा लागेल अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड इथे मांडली. कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केल्यावर ते बोलत होते.

शाहू , फुले , आंबेडकर आणि यशवंतराव यांचे पुरोगामी विचार आपल्यात आहेत , राज्यात धार्मिक तेढ वाढवून दंगे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ते मोडून काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असे ही पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी आज सकाळी पुण्यातून कराड इथे येऊन स्मृती स्थळावर आदरांजली वाहिली त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण होते. त्यासोबतच खासदार श्रीनिवास पाटील,आ. बाळासाहेब पाटील , अनिल देशमुख आणि काल अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे आ. मकरंद पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपण आज इथे येऊन पुन्हा नव्याने मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी आजच्या या कार्यक्रमात दाखवून दिले आहे.

ML/KA/SL

3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *