महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज आगामी महिला टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील नवव्या हंगामाला येत्या ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघासह १० संघ एकमेकांविरुद्ध भिडताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण २३ सामने खेळले जाणार आहेत. य स्पर्धेसाठी १० संघांना २ गटात विभागलं गेलं आहे. प्रत्येक गटात ४-४ संघ असणार आहेत. दोन्ही गटातील टॉप २ संघांना सेमीफायनलध्ये प्रवेश मिळणार आहे.
भारतीय संघ ४ ऑक्टोबर रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर भारत- पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघाचा तिसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी क्वालिफायर १ सोबत आणि चौथा सामना १३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने सिलहटमध्ये खेळले जाणार आहेत.
भारतीय संघाला अजून एकदाही ICC टी-२० वर्ल्डकप जेतेपद मिळवता आलेलं नाही. सर्वाधिक वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ६ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर वेस्टइंडीज आणि इंग्लंडने प्रत्येकी १-१ वेळेस जेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघाने २०२० मध्ये झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
स्पर्धेतील ग्रुप
ग्रुप ए- भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, क्वालिफायर १
ग्रुप बी – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, क्लालिफायर २
SL/ML/SL
5 May 2024