आजपासून सुरु होणार महिला प्रीमियर लीग क्रिकेट 2025
वडोदरा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : WPL चा तिसरा हंगाम आजपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी होत. या सामन्यादरम्यान उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सादरीकरण करणार आहे. हा समारंभ 14 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियममध्ये होत आहे. आयुष्मान त्याच्या गायन आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली आरसीबीला संघ हंगामाची सुरुवात गुजरातविरुद्ध विजयाने करायचा प्रयत्न करेल, ज्या संघाचे नेतृत्व अॅशले गार्डनर करत आहे.
लीगमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील. दिल्ली कॅपिटल्स यावर्षी कोणतेही सामने आयोजित करणार नाही. गेल्या वर्षी त्यांनी बेंगळुरूच्या सहकार्याने सामने आयोजित केले होते. यावेळी कोणत्याही दिवशी दोन सामने होणार नाहीत, म्हणजेच डबलहेडर होणार नाही. ५ संघांच्या या स्पर्धेत, सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. या लीगमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील.
SL/ML/SL
14 Feb. 2025