वुमन-२०परिषदेत ‘जन भागिदारी’ कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद
संभाजी नगर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी विविध देशांच्या प्रतिनिधींच्या वुमन :२० परिषदेत २६ फेब्रुवारीला ‘ जन भागिदारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात शहरातील महिला व युवतींसोबत ‘सक्षमीकरणाचा प्रवास’ या संकल्पनेवर संवाद साधला गेला.
या वेळी पालक मंत्री संदीपान भुमरे, आ.हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, वुमन २० परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्या सह परदेशातील पाहुण्याची उपस्थिती होती.
वुमन २० परिषद ही सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व क्षेत्रातील महिलां सहभागी झाल्या होत्या. यामध्ये बचतगट, अंगणवाडी सेविका, स्वच्छता कर्मचारी, एनजीओ, डॉक्टर, उद्योग,कला व संस्कृती, शिक्षण, उद्योग, पर्यावरण, क्रीडा, प्रशासन, पत्रकारिता आदी क्षेत्रातील महिला,युवतींसह स्टेकहोल्डर्स व सर्वसामान्य महिला सहभा गी झाल्या होत्या.
परिषदेसाठी शहरात आलेल्या प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असून सहभागी महिलांना थेट संवाद साधता आहे. जी-२० परिषद, वुमन २० परिषदेची जास्तीत जास्त माहिती पोचावी आणि महिलांच्या समस्या व शाश्वत पर्याय या दोन्ही बाजूंनी ही चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न होईल असे वुमन २० परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी सांगितले.
ML/KA/PGB
26 Feb. 2023