मनुस्मृतीचे दहन करून साताऱ्यात स्त्रीमुक्ती दिन साजरा

 मनुस्मृतीचे दहन करून साताऱ्यात स्त्रीमुक्ती दिन साजरा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृती दहन हाच स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यावेळी वंचितच्या जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा उपाध्यक्षा चित्रा गायकवाड, शहराध्यक्षा माया कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Women’s Liberation Day celebrated in Satara by burning Manusmriti

चित्रा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात सर्व जातीतील महिलांसह प्रत्येक माणसाला समानतेने जगण्याचा अधिकार दिला. मनुस्मृती दहन दिवस स्त्रियांच्या खऱ्या मुक्तीचे प्रतीक आहे, कारण तो त्यांना सन्मान आणि सन्मानाने भरलेले जीवन जगण्याचा विशेषाधिकार प्रदान करतो. मनुस्मृती ग्रंथानेही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता, असे प्रतिपादन महापौर मायाताई कांबळे यांनी केले. मानवतेचे अवमूल्यन करणाऱ्या या ग्रंथाला डॉ.आंबेडकरांनी पेटवून आम्हाला न्याय मिळवून दिला.

यावेळी जिल्हा युवा महासचिव सायली भोसले, बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रतीक्षा कांबळे, समाधान कांबळे, प्रमोद क्षीरसागर आदींनी स्त्रीमुक्तीबाबत सविस्तर माहिती कथन केली. शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. गौरव भंडारे यांनी आभार मानले. प्रारंभी बाबासाहेब यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास शहर उपाध्यक्षा पल्लवीताई काकडे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/PGB
26 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *