Womens Asia Cup ला स्थगिती

आशियाई क्रिकेट परिषदने वूमन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेला येत्या 6 जूनपासून सुरुवात होणार होती. चिकनगुनिया या विषाणूजन्य आजाराच्या प्रसारामुळे आणि हवामानामुळे स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती एसीसीने सोशल मीडियावरुन दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना पत्राद्वारे स्पर्धा स्थगित करण्याची विनंती केली.
शनिवारी श्रीलंकेत चिकनगुनियाला महामारी घोषित करण्यात आलं. कँडीत चिकनगुनियाचे हजारो रुग्ण आढळले. त्यामुळे खबरदारी म्हणून एमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.