सांगली जिल्ह्यातील महिलांनी घेतली १२ क्विंटल तुरी

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माडग्याळ (ता. जत) येथील महिला गट शेतकऱ्यांनी तुरीचे रोप तयार करून ठिबक आणि मलचिंग करून बेडवर लागवड केली. नावीन्यपूर्ण प्रयोग केला. १२ क्विंटल उत्पादन तुरीचे घेतले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकरी गटाला शाबासकीची थाप देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली.
तालुक्यात अवेळी पडणारा पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तूर पिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. माडग्याळ गावातील समता महिला गटाने एकत्र येऊन तूर पीक करायचे ठरवले. मागील चार ते पाच वर्षांचा विचार करता एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल असे तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती यायचे आणि कधी कधी शेतकरी जनावरांना चारा म्हणून पण सोडून देत असत.
ML/KA/PGB
18 Dec 2023