आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद जिंकणाऱ्या महिलांचा सन्मान, मिळालं इतक्या लाखांचं बक्षिस

जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला भारताच्या संघाने आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. सोनाली शिंगटेच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा स्पर्धेत जेतेपद मिळवले. यासाठी भारतीय महिला कबड्डी संघाला मंगळवारी 11 मार्च रोजी गौरवण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला 67 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.