दारुल उलूम मदरशाच्या कॅम्पसमध्ये महिलांना बंदी

लखनौ, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशमधील देवबंदमधील दारुल उलूम या इस्लामिक मदरशाने आपल्या कॅम्पसमध्ये महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. महिला येऊन सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर देशभरातून मुस्लिम समाजाकडून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मोहतमीम (प्रशासक) मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी सर्व महिलांसाठी बंदी घालण्याची घोषणा केली. “दारुल उलूम ही इस्लामिक सेमिनरी आहे आणि अशा प्रकारची कृत्ये कोणत्याही शाळेत मान्य नाहीत”, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दारुल उलूमच्या परिसरात महिलांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने महिलांनी याला प्रचंड विरोध केला. मशिदीच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, या निर्णयानंतर काही महिलांनी विरोधही केला. मात्र स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनीही समर्थन केले. दारुलच्या या निर्णयानंतर आता महिलांना येथील बांधकाम सुरू असलेल्या ग्रंथालयात आणि आशियातील प्रसिद्ध मशिदीमध्ये जाता येणार नाही.
SL/ML/SL
18 May 2024