महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक

 महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक

छायाचित्र प्रातिनिधीक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिलांचे उद्योजकांचे समूह तयार करून शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने ते सक्षम करणे दारिद्र्य निर्मूलनासाठी अत्यावश्यक आहे, असे मत द नज इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अतुल सतिजा यांनी व्यक्त केले. ‘प्रगती’ या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सच्या समूहाचा गौरव करण्यासाठी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या विशेष संमेलनात ते बोलत होते.

डिजिटल प्लॅटफॉर्म्स, निधी, मेंटॉरशिप याद्वारे महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी मेटा बांधील असून, अधिकाधिक महिलांमध्ये व्यवसाय करण्याची तसेच वाढवण्याची क्षमता निर्माण झाल्यास देश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या बळकट होईल, असे मेटा इन इंडियाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यावेळी म्हणाल्या. द नज इन्स्टिट्यूट आणि मेटाने आयोजित केलेल्या या संमेलनाला कॉर्पोरेट, सरकार, सामाजिक उद्योजकता आदी क्षेत्रांतील १२०हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. मेटा आणि द नज इन्स्टिट्यूट यांनी २०२१ मध्ये सुरू केलेल्या ‘प्रगती’ या उपक्रमाद्वारे आजवर स्त्रियांच्या नेतृत्वाखालील २९ ना नफा तत्त्वावरील स्टार्टअप्सना सहाय्य पुरविण्यात आले आहे.

ML/KA/PGB 1 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *