अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये फसली महिला

 अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये फसली महिला

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या शहरांमध्ये अनेक मजले असणाऱ्या इमारती असतात. त्या ठिकाणी लिफ्ट असणे ही गरज झाली आहे. परंतु या लिफ्टमुळे अनेक वेळा अपघात झाल्याचे समोर आले आहे. विद्युत पुरवठा खंडत झाल्यामुळे लिफ्ट बंद पडली. त्यावेळी लिफ्टमध्ये एक 42 वर्षीय महिला होती. त्यानंतर तब्बल 45 मिनिटे ती महिला मदतीसाठी आवाज देत राहिली. परंतु लगेच मदत मिळाली नाही. अखेर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु असताना ती महिला तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. राजस्थानमधील कोटा शहरात ही घटना घडली. त्यामुळे लिफ्ट असणाऱ्या इमारतींमधील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

रुक्मणीबाई यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबियांनी अपार्टमधील लोकांकडून वेळेवर मदत मिळाली नसल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप लावला. त्या खूप वेळेपर्यंत मदतीसाठी बोलवत राहिल्या. परंतु मदतीसाठी कोणीच आले नाही. अपार्टमेंटमधील लोकांनी कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला होता, असे त्यांचा कुटुंबियांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. Woman Trapped in Apartment Elevator

ML/ML/PGB
12 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *